Maharashtra Government

Training course to increase the conviction rate in criminal cases.

अ.क्र. विषय अभ्यासक्रम
test भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 कलम 173 अन्वये प्रथम खबर अहवाल प्रथम खबर म्हणजे काय? प्रथम खबर मधील आवश्यक मुद्ये, प्रथम खबर सर्व समावेशक कशी असावी, प्रथम खबर मधील महत्वाचे घटक, प्रथम खबर कोण देऊ शकतो, प्रथम खबर घेतांना घ्यावयाची दक्षता, प्रथम खबर घेतांना काय त्रुटी राहतात, विजकीय संदेशव्दारे दिली जाणारी खबर, भारतीय न्याय संहिता -2023 कलम 64 ते कलम 71 व कलम 74 ते 79 व कलम 124 या कलमान्वये अपराध केला असल्याचे किंवा अपराध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिकथन केले आहे अशी प्रथम खबर कोणत्याही स्त्रीने अथवा अशी व्यक्ती मानसिक दृष्टया किंवा शारीरिक दृष्टया विकलांग असेल तर प्रथम खबर नोंदविण्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले जाते. भारतीय नागरिक सुरक्षा संहिंता-2023 कलम 173 (3) प्रमाणे कायदयात नव्याने समाविष्ट केलेल्या कलमांबाबतही मार्गदर्शन केले जाते.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 कलम 176(1) घटनास्थळ पंचनामा पंचनामा म्हणजे काय? घटनास्थळ पंचनाम्याचे उद्देश, घटनास्थळ पंचनामा करतांना आवश्यक मुद्ये कोणते आहेत. घटनास्थळाचे संरक्षण, निरीक्षण, परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळ नकाशाची आवश्यकता व महत्व, पंच कसे असावेत. पंचनाम्याची तारीख वेळ व ठिकाण तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 176(3) मधील तरतुदी व e-Sakshya याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाव्दारे मार्गदर्शन केले जाते.
भौतिक पुरावा 1) भौतिक पुरावा म्हणजे काय व त्याचे पोलीस तपासात महत्व; भौतिक पुराव्याचे प्रकार उदा- Biological Material :- Blood, Semen, Saliva, Urine, Faecal Matter, Hair, Fiber, Tissues, Teeth and Bite Marks, Skeletal remains, Nails, Burnt remains, Vegetable materials, Diatoms, insects and Larvae, Vegetable and Animal Poisons, Bacteria etc. चे तपासातील महत्त्व व ते घटनास्थळावरुन ताब्यात घेण्याची प्रक्रिया. तसेच, भौतिक पुरावे हाताळताना, पॅकिंग करताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले जाते. 2) घटनास्थळाचे महत्व व घटनास्थळावरुन भौतिक दुवे शोधण्यासाठी घटनास्थळाची तपासणी कशा प्रकारे करावी हे प्रात्यक्षिकासह शिकविले जाते. 3) गुन्हे दोषसिध्दीसाठी भौतिक पुराव्याचे न्यायालयातील महत्व व त्यासंबंधी केस स्टडी सांगीतली जाते.
भौतिक पुरावे संकलन, हाताळणे, पॅकिंग, सिलींग, लेबलिंग व फॉरवर्डिग तपास अधिकाऱ्यांना जप्त मद्देमालाच्या पुराव्यांचे संकलन आणि जतन, पोलिस अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, जीवशास्त्र विभागातील मुद्देमाल हाताळतांना काय करावे आणि काय करु नये याबाबत मार्गदर्शन, तपासी अधिकारी यांनी मुद्देमाल सीलबंद केल्याचे आदर्श उदाहरणे, मुद्देमालास योग्य लेबलिंग कसे करावे, मुद्देमाल पुरावे सील करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना, पुरावे अग्रेषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, अग्रेषण पत्र, जीवशास्त्र आणि सेरोलॉजी विभागाचे महत्व, डीएनए सॅम्पलचे गुन्हे तपासातील महत्व, पॅकिंगची पद्धत आणि संबंधित नमुन्यांसाठी योग्य पॅकिंग मटेरिअल, विषशास्त्र विभागाचे महत्व, व्हिसेराचे जतन, मद्य नमुन्याबाबतचे मार्गदर्शक तत्व, याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाव्दारे मार्गदर्शन केले जाते.
तज्ञांचा पुरावा भारतीय साक्ष अधिनियम, 2023 चे कलम 39 यात तज्ञाची व्याख्या केलेली असुन कलम 40 यात तज्ञाच्या मताचे संबंधित तथ्ये नमुद करण्यात आलेले आहे. तसेच वरील कलमांच्या अनुषंगाने तज्ञ कोणास म्हणावयाचे, तज्ञांचे प्रकार, तज्ञांची मते कोणत्या परिस्थितीत ग्राह्य असतात याबाबत प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शन केले जाते.
गुन्हे तपासात अंगुली मुद्रा (Finger Print) संशयीत, आरोपी व फिर्यादी यांचे अंगुली मुद्रा पत्रिका कशा तयार केल्या जातात याबद्दलचे प्रशिक्षण तसेच घटनास्थळावरील गुन्हेगाराने हाताळलेल्या वस्तूंवर आढळणारे चान्स प्रिंट सुरक्षित कसे ठेवावे व घटनास्थळ हाताळताना घ्यावयाची काळजी याबद्दलचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. अंगुली मुद्रा शास्त्राचा पुर्व इतिहास: सर विल्यम हर्शल, डॉ. हेन्री फाउल्ड, सर फ्रान्सिस गाल्टन, सर इ.आर. हेन्री. उद्देश व मुलभूत तत्वे, The Criminal Procedure (Identification) Act-2022 संदर्भातील कलमे, अंगुली मुद्रांचे प्रकार व पत्रिका तयार करण्याच्या पद्धती (Rolled, Plain, Palm) व इतर संबंधित तरतुदी व प्रात्यक्षिके.
साक्षीदारांची तपासणी व पोलीसांना दिलेले जबाब भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 180 यात पोलीसांनी घ्यावयाची साक्षीदारांची तपासणी, कलम 181 यात पोलीसांना दिलेला जबाब व त्याचा पुराव्यात उपयोग, व कलम 183 यात कबुली जबाब आणि जबाब नोंदून घेणे याबाबत प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शन केले जाते.
मृत्युपुर्व जबाब भारतीय साक्ष अधिनियम, 2023 चे कलम 26(1) अंतर्गत मृत्युपूर्व जबाबाची तरतूद करण्यात आलेली आहे. मृत्युपुर्व जबाब म्हणजे काय? मृत्युपुर्व जबाबाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि तत्वे, जबाब कोण नोंदवू शकतो, जबाब नोंदवतांना घ्यावयाची काळजी आणि पुरावा मूल्य याबाबत प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शन केले जाते.
रिमांड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 187 अंतर्गत जेव्हा तपास 24 तासांत संपविणे शक्य नसेल तेव्हा अनुसरावयाची कार्यपध्दती म्हणजेच आरोपीचा रिमांड. रिमांड म्हणजे काय? रिमांडचे प्रकार, पोलीस कोठडी रिमांड कशासाठी घेतली जाते, कशी घ्यावी, कमाल किती दिवसांची असते, रिमांड नसल्यास कलम 438 अंतर्गत अपिल कशी करावी याबाबत मार्गदर्शन.
पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 185–186 अंतर्गत वॉरंट शिवाय झडती, झडती घेताना काय काळजी घ्यावी, घरझडती पंचनामा कसा करावा, लेखी नोंदी, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग इत्यादींचे नियम व मार्गदर्शन.
मेमोरंडम पंचनामा भारतीय साक्ष अधिनियम, 2023 चे कलम 23(2) अंतर्गत मेमोरंडम पंचनाम्याचे स्वरूप, उद्देश, आरोपीचे निवेदन कसे घेतले जाते आणि मेमोरंडम (रिकव्हरी) पंचनामा कसा केला जातो याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले जाते.
ओळख परेड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 54 व भारतीय साक्ष अधिनियम, 2023 चे कलम 7 यानुसार ओळख परेडचे उद्देश, पद्धती व कायदेशीर महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाते.
गुन्हयांचा अंतिम अहवाल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 193 अंतर्गत अन्वेषण पूर्ण झाल्यावर पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल व दोषारोपपत्र तयार करण्याच्या तरतुदी, कागदपत्रे व पुरावा कसा जोडावा याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन.
केस डायरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 192 अंतर्गत केस डायरीची नोंद कशी ठेवावी, स्वरूप, घटक, कायदेशीर आवश्यकता व परिणाम याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन.
कोर्टात साक्ष कशी द्यावी (पो. मॅ. भाग-3 नियम 244) कोर्टात साक्ष देण्याच्या तयारीचे मार्गदर्शन, सरकारी वकीलांचे सल्ले आणि साक्ष उत्तम प्रकारे सादर करण्याचे तंत्र.
गुन्हे दोषसिद्धी व प्रकरण सुटण्याची कारणे तपासातील त्रुटी टाळण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याचे मार्ग, पुराव्यांची मांडणी, परिस्थितीजन्य आणि भौतिक पुराव्यांमधील साखळी जोडण्याचे तंत्र, आणि संबंधित उच्च न्यायालय/सुप्रीम कोर्ट निर्देश.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 - अटके संदर्भातील कलमे कलम 35–43,47,50,57,58,60,49,51,53,54,173–176,179–181,183,187,189,192,193,194 इत्यादी कलमांची व्याख्या, कायदेशीर तरतुदी व व्यवहारातील अनुसरण याबाबत मार्गदर्शन व केस लॉ उदाहरणे.
भारतीय न्याय संहिता, 2023 मधील तरतुदी चोरीसंबंधी कलमे (301–306,317,331 इत्यादी) व इतर संबंधित कलमांचे महत्त्व, फरक व त्यांचे अनुपालन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम - 1951 कलम 99–117 व कलम 122,124 अंतर्गत करावयाची कारवाई व त्याबाबत मार्गदर्शन.
अकस्मात मृत्यु अकस्मात मृत्युची नोंद, चौकशी व रिपोर्ट तयार करण्याबाबत माहिती व मार्गदर्शन.
खुनासंदर्भातील कायदेशीर तरतुदी भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये खुनासंदर्भातील कलमे व त्यांचे घटक व कोणत्या परिस्थितीत कोणते कलम लागू होतात हे समजावून सांगणे.
खुनाच्या तपासातील बारकावे घटनास्थळ निरीक्षण, भौतिक पुरावे, जखमा, इंक्वेस्ट पंचनामा, मेमोरंडम पंचनामा व संशयिताशी विचारपूस, मृताची ओळख व इतर तपास तंत्र याबाबत मार्गदर्शन.
खुनाच्या तपासाचे कागदपत्र तयार करणे प्रथम खबर ते दोषारोपपत्र पर्यंत कागदपत्रे प्रशिक्षणार्थींनी बनवून घेणे व प्रशिक्षण देणे.
दरोडयाच्या तपासातील कायदेशिर तरतुदी दरोडयाचे घटक, संबंधित कलमे, शिक्षा व तपासात घ्यावयाची काळजी व त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक पावले.
दरोडयाचे तपासातील बारकावे दरोडयाचे प्रकार, पहिल्या खबरीत घेण्याच्या बाबी (गेला माल, आरोपीचे वर्णन, रिमांड, मुद्देमाल नोंदी, पंचनामा इ.), आणि रिपोर्ट व मालमत्ता डिस्पोजल संदर्भातील कार्यवाही.
लैंगिक अत्याचारातील गुन्हे व कायदेशीर तरतुदी PITA, हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंधक कायदे, तपास तंत्र, वैद्यकीय तपासणी, पुनर्वसन व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन.
घरफोडी गुन्ह्याचा तपास घरफोडीचे घटक, फिर्याद ते दोषारोपपत्र कागदपत्रे, संशयितांची विचारपूस, ओळख परेड व मेमोरंडम पंचनामा याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक.
घरफोडी कायदेशीर तरतुदी कलम 235, 329(2)–331(4) व संबंधित कलमे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन.
घरफोडी तपासातील बारकावे तपासात लक्ष केंद्रीत करावयाच्या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन जेणेकरून त्रुटी टाळता येतील.
घरफोडी विषयावर कागदपत्र तयार करुन घेणे फिर्याद लिहिणे, घटनास्थळ पंचनामा, इंक्वेस्ट व मेमोरंडम पंचनामा व दोषारोपपत्र यासंदर्भातील प्रत्यक्ष कागदपत्र बनविणे.
मोटार वाहन चोरी प्रकरणांचा तपास वाहने सुरक्षित ठेवण्याबाबत जनतेला सूचना, गस्ती व नाकाबंदी दरम्यान चोरीची वाहने व वाहन चोर कसे ओळखावेत याबाबत मार्गदर्शन.
32 आर्थिक गुन्ह्यात पुराव्याची चैन आर्थिक गुन्हे शाखेतील जबाबदाऱ्या, अपराध प्रकार, प्रथम खबर, झडती व तपास सूचना, केस डायरी व प्रगती अहवाल इत्यादींचे सखोल मार्गदर्शन.
33 सी. सी. आय. एस. (CCIS) CCIS, NCRB, SCRB, DCRB इत्यादी प्रणालींचे उद्देश व त्यातून माहिती मिळविण्याबाबत मार्गदर्शन.
34 प्रतिबंधक कारवाई प्रतिबंधक कार्यवाहीच्या कायदेशीर तरतुदी, कार्यवाही करताना घ्यावयाची काळजी व परिणामी कायदेशीर बाबी याबाबत मार्गदर्शन.
35 आय. टी. ऍक्ट मार्गदर्शन आयटी कायदा व सायबर क्राईम तपास, डिजिटल पुरावा संकलन व जतन, CDR अनॅलिसिस व संशयिताचे ऑनलाईन अस्तित्व शोधण्याबाबत मार्गदर्शन.
36 डम्पडाटा ऍनालिसीस टॉवर हद्दीतील कॉल्सचे विश्लेषण करून संशयिताचे उपस्थिती ठरविणे व घटनास्थळावर त्याचा वापर.
37 न्यायसहाय्यक प्रयोगशाळेची ओळख व महत्व लिकर/रासायनिक विश्लेषण, बेकायदा दारु, रक्तातील अल्कोहोल तपासणी इत्यादींचे प्रयोगशाळेत सविस्तर परीक्षण व प्रात्यक्षिक.
38 नारकोटिक्समध्ये न्यायसहाय्यक प्रयोगशाळेचे महत्व नारकोटिक्स व रासायनिक तपासणीसाठी क्रोमॅटोग्राफी व स्पेक्ट्रोस्कोपी इत्यादींचा वापर व प्रात्यक्षिके.
39 न्यायवैद्यक प्रयोगशाळेची भूमिका (हॉमिसाईड) रक्त, वीर्य व इतर जैविक पदार्थ तपासणी व डीएनए चाचणी तंत्रज्ञान व उपलब्ध प्रयोगशाळा यांचे महत्त्व.
40 लैंगिक अत्याचारांमध्ये न्यायवैद्यक शास्त्राची भूमिका बलात्कार व संबंधित प्रकरणांत जैविक पुराव्यांचे महत्त्व, प्रयोगशाळा तपास व डीएनए चाचणीचे वापर.
41 गुन्हे तपासात विषशास्त्रांचे महत्व विषबाधेच्या प्रकरणांत नमुने व तपासणी, वैद्यकीय व पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका व प्रात्यक्षिके.
42 फायरआर्म तपासातील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे महत्व गोळी, बंदूक व संबंधित पुराव्यांचे विश्लेषण व तपास प्रणालीचे महत्त्व.
43 न्यायसहाय्यक प्रयोगशाळा, नाशिक येथे भेट प्रयोगशाळेतील विभागांची माहिती व प्रत्यक्ष रासायनिक विश्लेषणाचे प्रदर्शन.
44 न्यायवैद्यक शास्त्राचे महत्व व व्याप्ती गुन्ह्यांचे प्रकार, तपासातील अडचणी आणि न्यायवैद्यक शास्त्राचे महत्त्व व तपासातील मुद्ये.
45 जखमांचे वर्गीकरण जखमांचे प्रकार, निदान व आग्निशस्त्र/वाहतूक अपघातांतील जखमांचे वैशिष्ट्ये व वर्गीकरण.
46 श्वसनावरोधाने होणारे मृत्यू फाशी, गळफास, पाण्यात बुडणे इत्यादी मृत्यू प्रकारांचे लक्षणे व फरक.
47 मृत्यूचे न्यायवैद्यक महत्व मृत्यूची कारणे, प्रकार, अवस्था व मृत्युच्या लक्षणांचे विश्लेषण.
48 शवविच्छेदन अहवाल अहवालातील मुद्यांचे मराठी भाषांतर, शवविच्छेदन प्रक्रिया व उत्खनन संबंधी तपशील.
49 छिन्नविच्छिन्न प्रेताची शवपरीक्षा सांगाड्याची ओळख, मृत्युचे संभाव्य कारण व वय ठरविण्याचे तंत्र याबाबत मार्गदर्शन.
50 व्यक्तिगत व प्रेताची ओळख पटविणे ओळख पटविण्याची आवश्यकता, 16 मुद्यांची सूची, प्रेताची ओळख व ऍंथ्रोपोमेट्री संदर्भातील माहिती.
51 विषशास्त्राचे गुन्हे तपासातील महत्त्व विषांचे प्रकार, विषबाधेची लक्षणे, तपासणीची पद्धत व पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका.
52 लैंगिक गुन्हे संदर्भात मार्गदर्शन लैंगिक अत्याचार, पीडित स्त्री व आरोपीची वैद्यकीय तपासणी व तपासाच्या तंत्रांची माहिती.
53 गर्भपात संदर्भात मार्गदर्शन वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971, गर्भपाताचे प्रकार, पुरावा व तपासणी संदर्भातील माहिती व मार्गदर्शन.
54 कॅलेंडर ऑफ इव्हीडंस (पुराव्याचा तक्ता) प्रत्येक आरोपीसापेक्ष पुराव्यांचा तक्ता तयार करण्याचे मार्गदर्शन व महत्त्वाचे पुरावे: आरोपीचे नाव, कायदा कलम, दस्तऐवजी पुरावा, परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे इत्यादी.
55 मानवी हक्कांबाबत मार्गदर्शन नागरिकांचे मुलभूत अधिकार व पोलीसांची जबाबदारी, मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी.
56 माहिती अधिकार कायदा RTI अंतर्गत माहिती कधी व कशी द्यावी, कोणत्या प्रकरणात न द्यावी व अपील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.
57 ताण-तणावाचे व्यवस्थापन पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव कमी करण्याच्या व्यावहारिक तंत्रांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन.
58 केस स्टडीज दरोडा, खुन, लैंगिक अत्याचार यासंबंधी दोषसिद्ध व निर्दोष प्रकरणांचे विश्लेषण व शिका